बहरीन, सौदीचे फॉर्म्युला वन रद्द; युद्धाच्या तणावाचा क्रीडा क्षेत्रावर परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर फॉर्म्युला वन आणि त्याची संचालन संस्था फेडरेशन इंटरनॅशनल दी वन ऑटोमोबाईल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव एप्रिल महिन्यात होणाऱया बहरीन ग्रॅण्ड प्रिक्स आणि सौदी अरेंबियन ग्रॅण्ड प्रिक्स या दोन्ही शर्यती रद्द करण्यात आल्या आहेत.

इराणशी संबंधित युद्धजन्य परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. युनायटेड स्टेट आणि इस्रायल यांनी हल्ले सुरू केल्यानंतर इराणनेही प्रत्युत्तरादाखल कारवाई करत या प्रदेशात तणाव वाढवला आहे. ही घोषणा रविवारी सकाळी चायनीज ग्रॅण्ड प्रिक्सपूर्वी शांघाय येथे करण्यात आली.

एप्रिलमध्ये बहरीन आणि जेद्दामध्ये होणार होत्या शर्यती

फॉर्म्युला वन शर्यती 12 एप्रिलला बहरीन ग्रॅण्ड प्रिक्स आणि 19 एप्रिलला सौदी अरेबियन ग्रॅण्ड प्रिक्स या स्पर्धा जेद्दाह येथे होणार होत्या. मात्र, पश्चिम आशिया प्रदेशातील फॉर्म्युला वनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्टेफानो डोमेनिकॅली यांनी सांगितले की, हा निर्णय घेणे कठीण होते. मात्र, पश्चिम आशियातील सध्याची परिस्थिती पाहता हा योग्य निर्णय आहे.