आम्ही EVM हॅक केले तर काँग्रेस नेत्यांना वाईट वाटलं, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता याचं विधान चर्चेत

आम्ही एकदा EVM हॅक केलं तर त्यांना वाईट वाटलं असे विधान भाजप नेत्या आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केले आहे. NDTV या वृत्त वाहिनीला मुलाखात देताना त्यांनी हे विधान केले आहे.

रेखा गुप्ता यांना मुलाखातरांनी विचारलं की काँग्रेसचा आरोप आहे की भाजपकडे निवडणूक आयोग आहे, ते ईव्हीएम हॅक करतात आणि जिंकतात. त्यावर रेखा गुप्ता म्हणाल्या की 70 वर्ष काँग्रेसने ईव्हीएम हॅक केले, आम्ही केलं तर त्यांना लगेच वाईट वाटलं. जेव्हा जेव्हा काँग्रेस निवडणूक हरतात तेव्हा त्यांचे नेते असे आमच्यावर आरोप करतात. देश आमच्यासोबत आहे, जेन झी आमच्यासोबत आहे, दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा विजय झाला हे यातून लक्षात येईल असेही गुप्ता म्हणाल्या.