
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं सरकार आलं की ही योजना बंद होणार असा भिती जनतेच्या मनात महायुतीच्या नेत्यांनी निर्माण केली होती असे विधान काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केले आहे. तसेच लोकसभेला यश मिळाल्यानंतर विधानसभेत आम्ही गाफील राहिलो अशी कबुली काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी दिली.
सकाळ समुहाला दिलेल्या एका मुलाखातीत सतेज पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत आम्हाला यश मिळालं. लोकसभेला एक नरेटिव्ह राहुल गांधी यांनी सेट केला होता. आणि लोकांपर्यंत त्यांनी वस्तूस्थिती नेली होती. भाजप कशा पद्धतीने आंबेडकरांनी दिलेल्या घटनेवर अतिक्रमण करत आहे हे भाजपच्या अनेक नेत्यांच्या विधानावरून सिद्ध झालं होतं. भारत जोडे यात्रेनिमित्र एक चांगलं वातावरण निर्माण झालं होतं. पण विधानसभा निवडणुकीत तिनही पक्षांनी फार वेळ घालवला. आधी जागावाटपाचा अकडा ठरवून पुढे जायला हवं होतं. त्या बैठकीला मीही होतो, त्यामुळे एकमेकांवर बोट दाखवण्यापेक्षा यासाठी आम्ही सगळे जबाबदार आहोत असे पाटील म्हणाले.
तसेच हा निर्णय कदाचित लवकर झाला असता आणि लोकांशी संवाद साधता आला असता. विधानसभा निवडणुकीत आम्ही थोडे गाफील राहिलो. लोकसभेला आम्हाला यश मिळाले आहे तर विधानसभेत आमचा 100 टक्के विजय निश्चित आहे या मनःस्थितीत आम्ही होतो. हरयाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीची वेळ बदलण्यात आली. आम्ही त्याच वेळेला सर्वोच्च न्यायालयात जायला हवं होतं. हरयाणासोबतच महाराष्ट्राची निवडणूक घ्या अशी मागणी करायला हवी होती. पण असे न होता याचा फायदा महायुती सरकारने घेतला, निवडणूक पुढे ढकलली. लाडकी बहीण योजना आणली. आणि पुढच्या तीन महिन्यांचे पैसे दिले गेले. असं कधी झालं नाही. कायदा, नियम मोडून डिसेंबरपर्यंत पैसे देण्यात आले. एका कुटुंबाच्या खात्यात 50 हजार रुपये आले होते. शेतकरी सन्मान योजना, राजील गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे एकदम आले होते. सरकारी पैश्यांवर लाडकी बहीण योजनेते मेळावे घेण्यात आले होते. महाविकास आघाडीचं सरकार आलं की ही योजना बंद होणार असा भिती जनतेच्या मनात त्यांनी निर्माण केली असेही सतेज पाटील म्हणाले.