विल्सन जिमखान्यासाठी उद्या मोर्चा; परप्रांतीयांना क्रीडांगणे बळकावू देणार नाही; ‘आम्ही गिरगावकर’चा निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मरिन ड्राइव्हच्या विल्सन निमखान्याचा वाद मुंबई उच्ब न्यायालयात प्रलंबित असतानाच, जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनने येथे आपल्या नावाचे फलक लावले आहेत. विल्सन जिमखाना परत घेतल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार आम्ही गिरगावकर या संस्थेने केला आहे. त्यासाठी २ फेब्रुवारीला आझाद मैदानात मोर्चाची हाक देण्यात आली आहे. स्थानिक मुलांची खेळण्याची मैदाने परप्रांतीयांना बळकावू देणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

विल्सन महाविद्यालयातील विद्यार्थी या मैदानामध्ये खेळायचे, गिरगावातील युवावर्गही या मैदानावर खेळण्यासाठी यायचा. मात्र उच्च न्यायालयाच्या निकालाआधीच हा जिमखाना जैन इंटरनॅशनल संस्थेच्या ताब्यात दिल्याने, हा जिमखाना कोणत्या अधिकारात संस्थेला देण्यात आला असा प्रश्न आम्ही गिरगावकर ‘तर्फे उपस्थित करण्यात आला आहे. याविरोधात 2 फेब्रुवारीला आझाड मैदानात मोर्चा काढण्यात येणार आहे.

आम्ही गिरगावरने याची माहिती देण्यासाठी पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, अरे कोण बोलतोय, देणार नाय..! ”आता, “विल्सन जिमखाना” परत घेतल्या शिवाय रहाणार नाय..!!” *खबरदार स्थानिक मुलांच्या खेळायची मैदाने ह्या परप्रांतीयांच्या घश्यात* घालाल तर…आम्ही रस्त्यावर उतरतोय २ तारखेला, तसेच सर्व खेळाडू, स्थानिक मराठी लोकं, सर्व पक्षातील पदाधिकारी, विलसन कॉलेजचे आजी- माजी विद्यार्थी, आपण पण सहभागी व्हावे ही विनंती. नाहीतर हे परप्रांतीय मुनी लोकं “विल्सन जिमखाना” सोबत आता विभागातील “सुलभ शौचालय” पण गिळायला तयार आहेत. आपण मिळून प्रतिकार करू व मैदान वाचवू हा आम्हाला आत्मविश्वास आहे. चला, तयार रहा २ तारखेला ठीक १ वाजता आझाद मैदान येथे भेटू .आपला विल्सन जिमखाना जिवंत राखायला..! अशी पोस्ट करण्यात आली आहे.