
उत्तराखंडमधील एका लग्नाची सर्वत्र चर्चा आहे. लग्नाचा दिवस कायम स्मरणात राहील यासाठी नवरा-नवरी काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करतात. मात्र या जोडप्याच्या लग्नाच्या दिवशी असे काही घडले की, त्याची चर्चा सुरू झाली. मुळचे मेरठ येथील या जोडप्याने उत्तराखंडमधील त्रियुगी नारायण मंदिरात लग्नगाठ बांधली. त्याचवेळी तेथे तुफान बर्फवृष्टी सुरू झाली. संपूर्ण परिसर बर्फाच्छादित झाला. त्यामुळे दोघांसह सोबत आलेल्यांना बर्फातून चालत परतावे लागले. याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यात नवरदेव आणि नवरी बर्फातून चालताना दिसतात. कडाक्याच्या थंडीत पारंपरिक लेहेंगा परिधान केलेल्या नवरीने जॅकेटदेखील ओढले आहे. या व्हिडीओवर नेटकऱयांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.



























































