
>> नीलिमा प्रधान
मेष – कार्यांना प्रतिसाद मिळेल
सूर्य चंद्र त्रिकोणयोग. बुध गुरू युति, साडेसाती पर्व सुरू आहे. अनेक कार्यांना प्रतिसाद मिळेल. नोकरीधंद्यात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दमदार काम होईल. चौफेर प्रतिष्ठेचा गवगवा होईल. कठीण कामे करा. शुभ दि. 27, 28
वृषभ – नवे कंत्राट मिळवा
बुध, शुक्र युती, रवि चंद्र त्रिकोण योग. सप्ताहाचा उत्तरार्ध यशाचा. किरकोळ अडचणींवर मात कराल.परिचय प्रेरणादायी ठरतील. नोकरीधंद्यात जम बसेल. नवे कंत्राट मिळवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना साहाय्य मिळेल. शुभ दि. 29, 30
मिथुन – चौफेर सावध रहा
बुध, गुरू षडाष्टक योग. बुध शुक्र युती. क्षेत्र कोणतेही असो चौफेर सावध रहा. प्रवासात वेग कमी ठेवा. कायद्याचे पालन करा. नोकरीच्या कामात दगदग होईल. व्यवहारात फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थ रहा. शुभ दि. 25, 26
कर्क – वेग नियंत्रणात ठेवा
सूर्य चंद्र त्रिकोणयोग, बुध शुक्र युती. उत्साह वाढेल. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. वरिष्ठांना कमी लेखू नका. व्यसन टाळा. धंद्यात जम बसेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना गती मिळेल. शुभ दि. 25, 26
सिंह – नात्यात तणाव होतील
रवि चंद्र षडाष्टक योग, चंद्र गुरू युती. प्रकृतीची काळजी घ्या. मैत्रीत, नात्यात तणाव होतील. मौल्यवान वस्तू जपा. नोकरीत तत्परता ठेवा. वाद वाढवू नका. अहंकार दूर ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपा. शुभ दि. 26, 27
कन्या – नोकरीत कौतुक होईल
बुध, शुक्र युती, चंद्र, शनि त्रिकोणयोग. सप्ताहाच्या सुरुवातीला कोणतीही चूक करू नका. वाद, तणाव दूर ठेवा. नोकरीत हुशारीचे कौतुक होईल. धंद्यातील समस्या वाढवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वतचे वर्चस्व वाढवा. योग्य मुद्दे मांडा. शुभ दि. 29, 30
तूळ – आक्रमक भाष्य टाळा
चंद्र, गुरू युती, चंद्र, मंगळ त्रिकोणयोग. आवेशात येऊन कोणतेही वक्तव्य करण्याची घाई नको. नोकरीत आक्रमक भाष्य टाळा. कामात चूक नको. धंद्यात चाणाक्ष रहा. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधात कारस्थाने होतील. शुभ दि. 26, 30
वृश्चिक – अडचणींवर मात कराल
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, बुध शुक्र युती. दूरदर्शीपणा, मधुर भाष्य वापरून कामे करून घ्या. नवीन परिचय तपासा. धंद्यात वाढ करण्याची संधी मिळेल. गुंतवणूक करताना विचार करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अडचणींवर मात कराल. शुभ दि. 28, 29
धनु – प्रगतीची संधी लाभेल
बुध शुक्र युती, चंद्र शुक्र त्रिकोणयोग. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी लाभेल. चातुर्य वापरा. किचकट कामे रेंगाळत ठेवू नका. डोळ्यांची काळजी घ्या. नोकरीत कामाची प्रशंसा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. शुभ दि. 26, 30
मकर – अहंकार दूर ठेवा
बुध, शुक्र युती, चंद्र, शनि त्रिकोणयोग. कुणाच्याही आहारी जाण्याची चूक नको. स्वत:चे अस्तित्व राखा. अहंकार दूर ठेवा. नोकरीत तत्परता राखा. वाद न करता सहनशीलता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरफायदा घेऊ देऊ नको. शुभ दि. 25, 28
कुंभ – प्रकृतीची काळजी घ्या
चंद्र, गुरू युती, चंद्र नेपच्यून त्रिकोणयोग. घरगुती समस्या त्रासदायक वाटतील. प्रवासात सावध रहा. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखावी लागेल. कठोर भाष्य नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रसंगावधान ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दि. 23, 24
मीन – प्रत्येक दिवस यशस्वी
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, बुध शुक्र युती. प्रत्येक दिवस यशस्वी करा. किचकट कामे करा. नवीन परिचय उत्साहवर्धक. महत्त्वाची कामे रेंगाळत ठेवू नका. नोकरीत प्रभाव वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांशी योग्य संवाद साधा. शुभ दि. 26, 27

























































