
मध्य प्रदेशातील इंदूर येथे नुकत्याच झालेल्या अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. या महाविद्यालयाच्या खेळाडू योगिता खेडकर हिने 87 किलोगटात 186 किलो वजन उचलून या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. कोमल वाकळे हिने 185 किलो वजन उचलून महाराष्टाला रौप्यपदक मिळवून दिले. या यशाबद्दल पाथर्डी तालुका वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष अॅड. सुरेशराव आव्हाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे, नगर जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुभाष देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, प्रा. संजय धोपावकर, रवींद्र सांगळे यांनी अभिनंदन केले.