
पहिल्या कसोटीप्रमाणे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीतही वेस्ट इंडीजचा सहज पराभव करत मालिकेत 2-0 असे निर्भेळ यश संपादले. ऑस्ट्रेलियाच्या 277 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव 143 धावांत आटोपला आणि ऑस्ट्रेलियाने 133 धावांनी कसोटी जिंकली. विंडीजकडून कर्णधार रोस्टन चेसने सर्वाधिक 34 धावा केल्या.