ओवा खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे होतात?

थंडीमध्ये ओवा खाण्याचे अनेक फायदे आहेत. पचन सुधारणे, वजन कमी करण्यास मदत होणे असे अनेक फायदे आहेत. ओव्यामध्ये फायबर आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. ओवा खाण्यामुळे आपली चयापचय क्रिया वाढून आपली चरबी कमी होण्यासही मदत होते. रात्री झोपण्यापूर्वी ओवा खाणे फायदेशीर ठरू शकते. खासकरुन ओवा हा सर्दी-खोकल्यावर प्रभावी मानला जातो. ओव्यामध्ये असलेले थायमॉल श्वसनमार्गातील अडथळे दूर करते आणि खोकल्यापासून आराम देते. ओव्याची वाफ घेणे देखील उपयुक्त आहे.

प्रसूतीनंतर वजन कमी करण्यासाठी या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, जाणून घ्या

ओव्यामध्ये दाहक-विरोधी आणि भूल देणाऱ्या गुणधर्मांमुळे सांधेदुखी आणि इतर वेदना कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबर थायमॉलमुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकते.

कडधान्य खाण्याचे अगणित फायदे काय होतात, वाचा सविस्तर

त्वचेसाठी देखील ओवा हा फार फायदेशीर मानला जातो. ओवा हा जळजळीच्या समस्या कमी करतो तसेच त्वचेच्या विविध समस्यांवर ओवा हा फार गुणकारी आहे.

आजकालच्या धावत्या जीवनशैलीमुळे आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा सतत चुकतात. कामासाठी तासनतास बाहेर राहावे लागत असल्याने बाहेरचे अन्नपदार्थ, फास्टफुड आपण खातो. तसेच अपूर्ण झोप, बिघडलेल्या दिनक्रमाचा सगळ्यात जास्त पोटावर परिणाम होत असतो. यातूनच मग पित्त, अॅसिडिडी, गॅसेस होणं यांसारख्या गोष्टी वारंवार जवळपास सगळ्यांच्याच बाबतीत होतात. वारंवार गॅस होण्यामुळे अनेकदा आपल्याला नकोसे होते. यावर ओवा हा फार महत्त्वाचा मानला जातो.

रोज रात्री चेहऱ्यावर तूप का लावायला हवे, जाणून घ्या

आपल्या प्रत्येकाच्या घरात ओवा हा असतोच. तुम्हाला जर पोटात मुरडा आल्यासारखे वाटत असेल तर हातावर ओवा थोडा रगडून तुम्हाला तो खायचा आहे. ओव्याचा वास आणि दाताखाली आलेल्या ओव्याच्या रसामुळे तुम्हाला छान आराम मिळेल. ओवा ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या सोबत सहज कुठेही जाताना बाळगू शकाल.