
घरात सुगंध दरवळावा यासाठी काही घरगुती उपाय करता येतात. घरात ताजी सुगंधी फुलं आणून ठेवल्यास घरात फुलांचा मंद सुगंध दरवळत राहातो. सेंटेड ऑइल, अर्धा कप व्हिनेगर आणि दोन कप पाणी घेऊन घरच्या घरी रूम फ्रेशनर तयार करता येते.
स्वयंपाकघरातला वास घालवण्यासठी कापूर वापरावा. लिंबू, संत्री, मोसंबी या सालांचा उपयोग रूम फ्रेशनर तयार करण्यासाठी करता येतो. दालचिनी तेल, गुलाबपाणी आणि बेकिंग सोडा यांचा एकत्रित उपयोग करून एअर फ्रेशनर तयार करता येते.


























































