
1. आपण ऑनलाईन माध्यमातून शॉपिंग करतो. ऑनलाईन ऑर्डर केलेली वस्तू खराब आल्यास कंपनीच्या वेबसाइट किंवा अॅपवर जाऊन ‘रिटर्न’ किंवा ‘एक्स्चेंज’ हा पर्याय निवडा.
2. वस्तू खराब का आहे, याचे कारण निवडा. जसे की, तुटलेली आहे, काम करत नाही किंवा ऑर्डर केलेल्या वस्तूच्या वेगळी आहे. तुमचे जे कारण आहे ते द्या.
3. ऑनस्क्रीन दिलेल्या सूचनांचे पालन करा. जसे की, खराब वस्तू परत पाठवण्यासाठी पॅक करणे आणि पुढील प्रक्रियेसाठी तयार राहणे.
4. जर कंपनीने प्रतिसाद दिला नाही किंवा तुमची समस्या सोडवली नाही, तर तुम्ही नॅशनल कंज्यूमर हेल्पलाइन पोर्टलवर तुमची तक्रार नोंदवू शकता.
5. लक्षात ठेवा की, ग्राहक संरक्षण कायद्यानुसार, सदोष वस्तू परत घेण्यास नकार देण्याचा अधिकार कंपनीला नाही. त्यामुळे तुमच्याकडे तक्रार करण्याचा अधिकार आहे.