
सध्या इन्स्टाग्राम ऍप वापरणाऱ्यांची संख्या कोटीच्या घरात आहे. इन्स्टावर रील, फोटो, व्हिडीओ मोठय़ा प्रमाणात पाहिले जातात.
इन्स्टाग्रामवर कधी कधी पासवर्ड लक्षात राहत नाही. अनेक जण पासवर्ड विसरतात. जर तुमच्या बाबतीत असे काही झाले तर काय कराल यासंबंधी टिप्स.
पासवर्ड विसरला असाल तर पासवर्ड रिसेट करता येतो. ई–मेल, फोन नंबर किंवा युजरनेमच्या माध्यमातून पुन्हा एकदा पासवर्ड रिसेट करता येऊ शकतो.
इन्स्टाच्या अकाऊंट आयकॉनवर क्लिक करून प्रोफाईल पेजवर जाऊन तीन ओळीच्या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी नवीन पासवर्ड टाका. सेव्ह बटनवर क्लिक करा.
मोबाईलसोबत डिस्कटॉपवरील इन्स्टाग्रामचा पासवर्डसुद्धा बदलता येतो. या ठिकाणी प्रोफाईल एडिट करा. नवीन पासवर्ड टाका आणि सेव्ह करा.