असं झालं तर… बनावट आयफोन मिळाला तर…

आयफोनची क्रेझ संपूर्ण जगभरात आहे. हिंदुस्थानातही आयफोन खरेदीसाठी लाखो रुपये मोजण्याची तयारी अनेकांची असते.

काही वेळेला मार्केटमध्ये अनेक जणांना आयफोनच्या नावाखाली बनावट आयफोन दिला जातो. तुमच्या बाबतीत जर असे झाले तर काय कराल.

फोन स्वस्तात मिळत असेल तर सावधगिरी बाळगा. अधिकृत विक्रेत्याकडूनच आयफोन खरेदी करा. फोनमधील कॅमेरा, स्पीकर आणि अन्य फिचर्स तपासा.

मूळ आयफोन आयओएस ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो, तर बनावट फोनमध्ये अँड्रॉईड किंवा अन्य ऑपरेटिंग सिस्टीम असू शकते.

आयफोनमध्ये सिरी आहे की नाही तपासा. बनावट फोनची बॉडी स्लीम किंवा प्लॅस्टिकची असू शकते. बनावट फोन असेल तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करा.