
आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2025 आहे. या तारखेनंतर दंड बसू शकतो. या भीतीने करदाते घाईघाईने आयटीआर भरतात. अशावेळी चुका होतात.
चूक झाल्यास सुधारित आयटीआर दाखल करता येतो. सुधारित आयटीआर दाखल केल्यानंतर त्याची पडताळणी करणे गरजेचे आहे.
करदात्यांना कितीही वेळा सुधारित आयटीआर दाखल करता येतो. तुमचा रिफंड झाल्यानंतरही सुधारित आयटीआर फाईल करता येतो.
आर्थिक वर्ष पूर्ण होण्याच्या तीन महिने आधी सुधारित आयटीआर भरता येतो. या काळातही न भरता आल्यास वर्ष पूर्ण होण्याआधी ते दाखल करण्याची मुभा आहे.
स्वतःचे नाव चुकीचे लिहिणे, पॅन कार्ड- आधारची चुकीची माहिती, बँक खात्याचा क्रमांक लिहिण्यात चूक, चुकीच्या फॉर्मची निवड, कर वजावटीचा चुकीचा दावा करणे या चुका होऊ शकतात.