
नोंदणीकृत नसलेले मृत्युपत्रही कायदेशीररीत्या वैध असते, कारण भारतीय नोंदणी कायदा, 1908 नुसार त्याची नोंदणी ऐच्छिक आहे.
दोन साक्षीदार, सही आणि योग्य प्रक्रियेचे पालन केले असल्यास ते वैध मानले जाते, मात्र नोंदणी नसल्यास भविष्यात कायदेशीर वादाची शक्यता असते.
त्यामुळे मृत्युपत्र नोटरी करून किंवा नोंदणीकृत करणे योग्य ठरते. न्यायालयीन प्रक्रियेत हे सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांची साक्ष आवश्यक असते.
नोंदणीकृत नसलेले मृत्युपत्र गहाळ होणे, फाटणे किंवा चोरी होण्याची शक्यता असते; पण नोंदणीकृत दस्तऐवज हा कायम सुरक्षित असतो.
नोंदणी नसल्यास वारसदार मालमत्तेच्या बदलाबद्दल आक्षेप घेऊ शकतात. भविष्यातील कायदेशीर कटकटी टाळण्यासाठी मृत्युपत्राची नोंदणी करणे सुरक्षित असते.



























































