
परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा महत्त्वाचा आहे. त्याशिवाय आपल्या देशातून दुसऱया देशात जाता येत नाही. कधी कधी पासपोर्ट रिजेक्ट केला जातो.
अशावेळी सर्वात आधी पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर तुमचा पासपोर्ट का नाकारला, याची कारणे शोधा. पुन्हा अर्ज करण्यासाठी नेमके कारण जाणून घेणे आवश्यक आहे.
जर रिजेक्शनचे कारण कागदपत्रांमधील त्रुटी किंवा चुकीची माहिती असेल, तर ती दुरुस्त करा. तुम्ही रिजेक्शनच्या कारणाशी सहमत नसाल तर पासपोर्ट कार्यालयात अपील करू शकता.
अर्ज रिजेक्ट झाल्यास अर्ज शुल्क परत मिळत नाही. नवीन पासपोर्ट अर्जासाठी तुम्हाला अर्ज आणि शुल्क पुन्हा नव्याने भरावे लागेल. त्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही.
अर्ज करताना योग्य कागदपत्रे आणि अचूक माहिती द्या. चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रे अर्ज नाकारण्याचे मुख्य कारण असू शकतात हे लक्षात ठेवा.

























































