
व्हॉट्सअॅप फीचरचा अधिकाधिक लोकांनी वापर करावा, यासाठी पंपनीतर्फे नवनवीन फीचर आणले जात असतात. आताही एक नवीन आणि उपयुक्त फीचर येणार आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर चॅटिंग करणे आता आणखी सोपे होणार आहे. व्हॉट्सअॅप कंपनी आता ऑटोमेटिक ट्रान्सलेशन फीचरवर काम करत आहे. या फीचरमुळे युजर्सला चॅटिंग मेसेज सहज दुसऱया भाषांमध्ये भाषांतरित करता येईल.
व्हॉटस्अॅपच्या फीचरचे ट्रकिंग करणाऱया ‘डब्ल्यूएबीटाइन्पह्’ने सांगितले की, अॅपलची ऑपरेटिंग सिस्टीम असलेल्या आयओएस प्लॅटफॉर्मसाठी ऑटोमेटिक ट्रान्सलेशन फीचरवर टेस्टिंग सुरू आहे. या फीचरसाठी युजर्सला 21 पैकी कोणत्याही एका भाषेची निवड करावी लागेल. त्यानंतर युजर्स त्याला आलेला मेसेज निवडलेल्या भाषेत ट्रान्सलेट करू शकेल. त्यासाठी एक लहानसी सेटिंग बदलावी लागेल. या फीचरमध्ये ट्रान्सलेशननंतर एंड टू एंड एनक्रिप्शन सुविधा असेल. या फीचरचा टेस्टिंग स्क्रीन शॉट शेअर करण्यात आला आहे.
कसे भाषांतर कराल
कुणा एका व्यक्तीचे चॅटिंग मेसेज निवडा. त्यानंतर फीचरमधील ट्रान्सलेशन ऑन करा. ज्या भाषेत चॅटिंग ट्रान्सलेट करायचे आहे, ती भाषा निवडायची. त्यानंतर चॅटिंग सहज ट्रान्सलेट होईल. हे फीचर नेमके कधी सुरू होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

























































