व्हॉट्सअ‍ॅपकडून 98 लाख अकाऊंट बंद

व्हॉट्सअ‍ॅपचा गैरवापर करणाऱ्या खात्यावर कंपनीकडून कारवाई करण्यात आली. व्हॉट्सअ‍ॅपने जून 2025 मध्ये 98 लाख अकाऊंट्स बंद केले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपला जूनमध्ये हिंदुस्थानातून 23,596 तक्रारी मिळाल्या होत्या. यात 1001 अकाऊंट्सवर कारवाई करण्यात आली. यूजर्सची सुरक्षा करणे हे व्हॉट्सअ‍ॅपचे कर्तव्य आहे. यासाठी कंपनी एंड-टू-एंड एक्रिप्शन, सेफ्टी टूल्स, आणि डेडिकेटेड टिम्सची मदत घेते.