व्हॉट्सअ‍ॅपवर यूट्यूबसारखे पॅरेंटल कंट्रोल फीचर येणार

नव्या वर्षात व्हॉट्सअ‍ॅपने मुलांच्या ऑनलाईन सुरक्षिततेसाठी नवे फीचर आणण्याची तयारी केली आहे. पालकांच्या वाढत्या चिंता लक्षात घेऊन व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आता पॅरेंटल कंट्रोल हे फीचर येत आहे. हे फीचर यूट्यूबच्या ‘सुपरवाइज्ड मोड’सारखे काम करेल. आपली मुले काय पाहतात, यावर पालकांना नियंत्रण ठेवता येईल. पालकांना त्यांच्या मुलांच्या व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटीवर देखरेख ठेवण्यासाठी एक विशेष डॅशबोर्ड किंवा सेटिंग्ज मिळतील.

पालकांना विशेष अधिकार

कॉन्टॅक्ट मॅनेजमेंट ः मुले कोणाशी चॅट करत आहेत आणि त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नवीन कोणाचा समावेश झाला आहे, हे पालकांना पाहता येईल.
स्क्रीन टाईम लिमिट ः मुले दिवसातील किती वेळ व्हॉट्सअ‍ॅपवर घालवत आहेत याचे पूर्ण नियंत्रण पालकांकडे असेल. ठरावीक वेळेनंतर अ‍ॅप आपोआप लॉक होण्याची सुविधा असू शकते.
ग्रुप इन्व्हिटेशन ः मुलांना कोणत्याही अनोळखी ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्यापूर्वी पालकांची परवानगी आवश्यक असण्याचे फीचर यात दिले जाऊ शकते.

फीचर का महत्त्वाचे

सायबर बुलिंगपासून संरक्षणः मुलांचे सायबर फसवणूक किंवा छळापासून वाचवता येईल.
डेटा सुरक्षा ः अनोळखी लिंक्स किंवा एपीके फाईल्सद्वारे होणाऱ्या फ्रॉडपासून मुलांचे रक्षण करणे.
सोशल मीडियाचा अतिवापर टाळणे ः अभ्यासाच्या वेळी मुले व्हॉट्सअ‍ॅपवर नाहीत ना, यावर नियंत्रण ठेवता येईल.