
वय वाढणं हे कुणालाही चुकलेले नाही. वाढत्या वयासोबत आपणही स्वतःची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहेत. खासकरुन चाळीशीनंतर स्त्रियांनी स्वतःची सर्वाधिक काळजी घ्यायला हवी. बाहेर कुठेही जाताना मेकअप करताना काही महत्त्वाच्या टिप्स या फाॅलो करायला हव्यात. चाळीशीनंतर स्त्री स्वतःच्या सौंदर्याबाबत अधिक जागरूक आणि सजग झालेली दिसते. म्हणूनच चाळीशीतील स्त्री अगदी तरुणींना लाजवेल अशा पद्धतीने स्वतःला कॅरी करताना आपल्याला दिसते. परंतु अनेकजणी मात्र चाळीशीत आलोय, आता कशाला हवाय मेकअप आणि काय असे बोलताना दिसतात. खास अशा स्त्रियांसाठी काही खास मेकअप टिप्स.
वाढत्या वयात मेकअप करताना हे लक्षात ठेवायला हवं
तुम्हाला कन्सीलर वापरायचे असेल तर फाऊंडेशनप्रमाणेच लिक्विड बेस्ड कन्सीलरही खरेदी करा.
मॉइश्चरायझर असलेले फाउंडेशन खरेदी करा. त्यामुळे कोरड्या त्वचेला मुलायम पणा येतो.
त्वचेला चमकदार प्रभाव देण्यासाठी, फिकट पिवळ्या शेडचे फाउंडेशन लावा.
ओठांवर लिप बाम लावा. डोळ्यांच्या मेकअपसाठी तुम्ही काजल वापरू शकता.
वाढत्या वयाबरोबर त्वचा कोरडी होते. अशा परिस्थितीत, त्वचेला अतिरिक्त मॉइश्चरायझरची आवश्यकता असते, ज्यामुळे त्वचेतील आर्द्रतेची कमतरता पूर्ण होऊ शकते. त्यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा कमी करण्यासाठी दिवसा आणि रात्री दोन्ही ठिकाणी मॉइश्चरायझर लावून चेहरा मॉइश्चरायझ करा. यामुळे त्वचा मुलायम होईल आणि चमकही येईल.
चेहऱ्यावरील सुरकुत्या लपवण्यासाठी अँटी एजिंग क्रीम वापरा.
मेकअपमुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढते हे मान्य, पण मेकअप केल्याने आत्मविश्वासही द्विगुणित होतो हेही वास्तव आहे.
फाउंडेशनऐवजी बीबी किंवा सीसी क्रीम लावा. यामुळे तुम्हाला नॅचरल लुक मिळेल.
बेस मेकअपसाठी फेस पावडर वापरणे टाळा. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात.
हिवाळ्यात घरच्या घरी हाॅटेलसारखी कांदा भजी करताना या टिप्स वापरा, वाचा
परिपूर्ण बेससाठी मॅट फिनिश लिक्विड फाउंडेशन वापरा.
आयशॅडो लावण्यापूर्वी, प्राइमर लावून डोळ्यांच्या मेकअप करा. प्राइमरप्रमाणे, तुम्ही परफेक्ट बेससाठी कन्सीलर देखील लावू शकता, पण डोळ्यांभोवती नाही, फक्त डोळ्यांच्या खालच्या भागात लावा जेणेकरून काळी वर्तुळे लपतील.
डोळ्यांचा गडद मेकअप करणे टाळा. यामध्ये तुमचे वय अधिक दिसून येते.
लूक कॅरी करताना आत्मविश्वास हा गरजेचा आहे. हे लक्षात ठेवायला हवं. आत्मविश्वास हा कोणत्याही गोष्टींसाठी सर्वात महत्त्वाचा आहे.
मेकअप करताना नैसर्गिक लूकसाठी, डोळ्याच्या वरच्या पापणीवर आयलायनर लावावे.
























































