
दही लावताना काही टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर नक्कीच उन्हाळ्यातही घट्ट दही तुम्हाला लावता येईल. दुधाचं दही तुम्ही लावणार असाल तर ते दूध थोडंसं उकळवून आटवून घ्या. कारण जेवढे दाट दूध असेल तेवढे दही छान लागते.
दही घट्ट होण्यासाठी दूध थोडे गरम करा. पाव लीटर कोमट दूध असेल तर त्यात 1 चमचा मिल्क पावडर मिसळा. दही लावण्यासाठी खूप पातळ विरझण वापरू नये. विरजनही घट्ट असावं तसेच ते खूप आंबट असू नये.



























































