
>> डॉ. आशुतोष कुलकर्णी
शरीराचे आरोग्य आणि आकारमान दर्शविणारा ‘मांस धातू’, ज्याची योग्य वयात योग्य काळजी घ्यायला हवी. आजकालची तरुण पिशरीर सुदृढ करण्यापेक्षा मांसवृद्धी करण्याच्या मागे लागली आहे. कितीही प्रयत्न केले तरी ‘मसल गेन’ होत नाही अशी त्यांची पार असते. त्यांना या लेखातून काही उपयुक्त माहिती मिळेल ही अपेक्षा. अरनॉल्ड, रॉनी कोलमन, आपल्या भारतातील प्रेमचंद डोग्रा, दारासिंग ही मांस धातू अधिक असण्याची उत्तम उदाहरणे आहेत.
‘मांस’ हा शब्द संस्कृतमधील ‘मंस’ या धातूपासून आला आहे, ज्याचा अर्थ मांस किंवा शरीरातील स्नायू असा होतो. मांस धातू शरीराची वाढ करतो, विविध अवयवांना आच्छादन देतो आणि सांधे व शरीराच्या हालचालींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. पंचमहाभूतांपैकी वायू, जल आणि अग्नी महाभूत मांस धातूच्या निर्मितीत महत्त्वाचे आहेत. आयुर्वेदात मांस धातूचे गुणधर्म स्थूल, स्थिर, गुरू, खर, कठीण, मऊ असे सांगितले आहेत.
निर्मिती प्रािढया : मांस धातू हा रक्त धातूपासून तयार होतो. आहार रस आणि रक्त धातू यांच्या पोषक भागांचे मांस धात्वाग्नीच्या सहाय्याने रूपांतर होते. गर्भावस्थेत मांस व अस्थी धातू पाधातूपासून विकसित होतात.
मांसधारा कला : त्वचेचे सात स्तर असतात. मांसधारा हा आतला स्तर आहे. जाडी साधारण 1-3 मिमी असते. भगंदर, फोड, मूळव्याध यांसारख्या रोगांमध्ये हा स्तर प्रभावित होतो. मांसाचा उपधातू वसा (चरबी) आणि त्वचा आहे.
मांस धातूचे कार्य : शरीराचे आच्छादन करणे आणि संरक्षण देणे, शरीराला बळ देणे, हालचालींना मदत करणे, अंतर्गत अवयवांचे संरक्षण करणे इत्यादी कामे मांस धातूद्वारे केली जातात. शरीराच्या विविध हालचाली, उदा आकुंचन, प्रसारण इत्यादी महत्त्वाची कामे मांस धातू करत असतो.
उत्तम मांस धातूची लक्षणे (मांस सार मजबूत व सुबक स्नायू असणे, शरीर घट्ट व संतुलित असणे, असामान्य सहनशक्ती, संयम आरोग्य, बल आणि दीर्घायुष्य ही महत्त्वाची मांस साराची लक्षणे आहेत.
विकृतीची कारणे : दिवसा झोप हे मांस धातू विकृतीचे प्रमुख कारण मानले जाते. व्यायामाचा अभाव, अतिविश्रांती / शारीरिक हालचालींचा अभाव, अति खाणे, अनियमित दिनचर्या, अग्नी मंद होणे (चयापचय कमी होणे), दोषांचा असंतुलन (विशेषत कफ व पित्त), स्रोतसांमध्ये अडथळा.
मांस धातू विकृत करणारे अन्न पदार्थः मांसधातू बिघडण्याचे कारण प्रामुख्याने जड, स्निग्ध, अभिष्यंदी (स्रोत बंद करणारे) अन्नाचे अति सेवन होय. अति मांसाहारानेसुद्धा मांसवृद्धी होणे कमी होते. त्यासाठी परिपूर्ण षड्रस आहार घेणे आवश्यक आहे.
दही (विशेषत रात्री), चीज, पनीर, जास्त दूध व दुग्धजन्य पदार्थ, मैद्याचे पदार्थ (पाव, बिस्किट, केक) हे पदार्थ शरीरातील सूक्ष्म वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करतात. अति प्रमाणात मांस सेवन, विशेषत जड व तेलकट मांसाहारामुळे मांस धातूची असंतुलित वाढ किंवा विकृती होते. स्निग्ध पदार्थ उदा. तळलेले पदार्थ (भजी, पुरी, समोसा), फास्ट फूड, जास्त तेलकट व मसालेदार पदार्थ हे सर्व पदार्थ विकृती उत्पन्न करणार आहेत. तर गोड (मिठाई, साखरयुक्त) पदार्थ मांस वाढ पण अति झाल्यास विकृती निर्माण करतो. आंबट (लोणचे, चिंच) पदार्थ दाह निर्माण करतात, खारट (चिप्स, पापड) पदार्थ स्नायूंची हानी करतात. तिखट अन्न स्नायूंचे क्षरण, क्षय करते. कडू अन्न कोरडेपणा व लवचिकता कमी करते.
मांस धातू क्षय झाल्यास स्नायू कमी होणे, अशक्तपणा, थकवा, कोरडेपणा, वेदना ही लक्षणे दिसतात. मांस धातूसंबंधित रोग प्रामुख्याने मूळव्याध, फोड, गाठ (टय़ुमर), त्वचारोग, सूज, क्षय हे होत.
औषधोपचार : शोधन (पंचकर्म), आवश्यकता असल्यास उदा. टय़ुमर असल्यास शस्त्रािढया, क्षार व अग्निकर्म हे उपचार करावे लागतात.
संतुलित आहार : मांस धातूचे पोषण हवे असल्यास मांस व मांसरस पोषणासाठी उपयुक्त असतो. मांस धातू कमी असल्यास मांसाहार वा
शाकाहारी लोकांसाठी योग्य प्रमाणात दूध, तूप, कडधान्ये, सुका मेवा, गहू/तांदूळ, केळी हा सर्वोत्तम शाकाहारी मांस धातू वृद्धिकर आहे.
विहार अथवा जीवनशैली : मांस धातू जास्त असल्यास दिवसा झोप टाळावी, कमी असल्यास विश्रांती घ्यावी. नियमित व्यायाम करावा. व्यायाम शरीराला स्थिरता आणि बळ देतो, स्नायू व चयापचय सुधारतो. मांस धातू शरीराच्या ताकदीशी थेट संबंधित आहे. योग्य प्रमाणात असल्यास रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.






























































