
उद्यापासून मी पाणीसुद्धा पिणार नाही अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. तसेच मराठा आंदोलकांनी शांत रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
आझाद मैदानात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरु केले आहे. आज आंदोलकांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मी उद्यापासून पाणीसुद्धा पिणार नाही. सरकार मागण्या मान्य करत नाही, हे सरकारच्या लक्षात येत नाही त्यामुळे उद्यापासून मी पाणीसुद्धा बंद करणार आणि कडक उपोषण सरु करणार. तसेच मराठा आंदोलकांनी कुणावरही दगडफेक करून नये, मराठा समाजाच्या एकाही पोराने दगड फेक करायची नाही, समाजाला मान खाली घालावी लागल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही. सगळ्यांनी शांत राहायचं. त्यांना आपल्यावर कितीही अन्याय, अत्याचार करू द्या मला तुमच्याकडून शांतता पाहिजे. मी तुम्हाला आरक्षण देणार, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही. अन्नछत्र आणि रेनकोटच्या नावाने कुणी पैसे उकळत असेल तर तसे करू नका काही लोकांनी लोकसभा निवडणुकीला तसे प्रकार केले होते. जर असे परत घडल्यास मी नावं जाहीर करीन असेही जरांगे यावेळी म्हणाले.