खिडक्यांचे पडदे धुळीने माखले तर…

घरातील हॉल, बेडरूम किंवा खिडकीला लावलेले पडदे धुळीने माखले असतील तर त्यांना स्वच्छ करण्याचे सोपे उपाय आहेत. घरातील खिडक्या स्वच्छ असतील तर पडदे धुळीपासून सुरक्षित राहू शकतील.

खिडक्या उघडय़ा ठेवल्यास मोकळी हवा येते. त्यामुळे पडद्यांना वास येत नाही. पडद्यांना स्टिम क्लिनिंग करा. धूळ साफ करण्यासाठी सगळ्यात आधी पडदे खाली काढून घ्या. ते व्यवस्थित झटकून घ्या.

पडदे उन्हात ठेवा. धूळ माखलेले पडदे तीन ते चार तास उन्हात सुकवले तर पडद्यांना येणारा दुर्गंध कमी होतो. पडद्यांना न धुता तुम्ही स्टिम क्लिनिंग करू शकता. व्हॅक्युम क्लिनरच्या मदतीने धूळ साफ करू शकता.