हे करून पहा – हिवाळ्यात कोरड्या त्वचेवर प्रभावी उपाय

हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्यामुळे चेहरा निस्तेज दिसतो. कोरडया त्वचेवर महागड्या क्रीम लावल्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात. अशा वेळी संत्रीचा वापर करता येतो. संत्रीच्या सालीमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते. त्याचा एक सिरप बनवून त्वचेवर लावल्यास हिवाळ्यात अतिशय उपयुक्त ठरतो.

संत्र्याची साल, लिंबू आणि पपईच्या साली पाण्यात उकळून घ्या. त्यात बदाम तेल, ग्लिसरीन, कोरफडीचा गर आणि व्हिटॅमिन ई पॅप्सूल मिसळावे. हे मिश्रण लावल्याने त्वचेचा कोरडेपणा जातो आणि सुरकुत्याही कमी होतात. फ्रिजमध्ये ठेवल्यास दोन आठवडे ते वापरता येऊ शकते.