
मध्य पूर्वेतील तणावाचा फटका मोठया प्रमाणावर आयटी क्षेत्राला बसलला आहे. विप्रोचे शेअर्स मोठया प्रमाणावर कोसळल्याचे चित्र आहे. इन्पहसिस, विप्रो आणि टीसीएस यांसारख्या बडय़ा दीग्गज कंपन्यांचे शेअर्स तब्बल 3 टक्क्यांनी कोसळले. तसेच अमेरिकन आयटी क्षेत्रातील कंपनी अॅक्सेंचरलाही मोठा फटका सहन करावा लागला. तिमाही निकालानंतर अॅक्सेंचरचे शेअर्सही गडगडल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. हिंदुस्थानी आयटी कंपन्यांमध्ये इन्पहसिसचे शेअर्स सर्वाधिक म्हणजेच 2.45 टक्क्यांनी घसरले तर एलटीआय माईंडट्रीचे शेअर्स 0.64 टक्क्यांनी घसरले.