
एसबीआयच्या योनो कॅश सेवेद्वारे ग्राहकांना विनाडेबिट कार्डने एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. एसबीआयच्या ग्राहकाकडे केवळ एक स्मार्टफोन आवश्यक आहे. यावर एसबीआयचा योनो अॅप असल्यास थेट एटीएममधून विनाडेबिट कार्ड पैसे काढण्याची सुविधा मिळते. देशभरातील 16 हजार 500 हून अधिक एसबीआयच्या एटीएममध्ये योनो कॅश पॉइंट बनवले आहेत. नेट बँकिंग युजर आयडी आणि पासवर्ड किंवा 6 अंकांच्या एमपिनद्वारे लॉगिन करा.
लॉगिन झाल्यानंतर अॅपच्या होम पेजवर योनो कॅशचा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा. यानंतर न्यू रिक्वेस्ट सेक्शनमध्ये जाऊन एटीएम ऑप्शन निवडा. आता जेवढी रक्कम काढायची आहे ती टाका. यावेळी एक 6 अंकांचा योनो कॅश पिन बनवायला लागेल. नियम-अटी कन्फर्म करून क्लिक करा. यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबरवर 6 अंकांचा ट्रान्झॅक्शन रेफरेन्स नंबर एसएमएसवर येईल. तो टाकल्यानंतर पैसे काढता येतील. एटीएममधून एकावेळी 10 हजार आणि दिवसभरात जास्तीत जास्त 20 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येईल.