
रेल्वेतून प्रवास करणे आता आणखी धोकादायक झाले आहे. कारण सरकारी कर्मचाऱ्याकडूनच एका महिला प्रवाशाला धक्कादायक अनुभव आला आहे. रेल्वेतील टीसीने एका तरुणीला तिकीटाची विचारणा केली. या तरुणीने आपल्याकडचे तिकीटही दाखवले. पण या टीसीने या तरुणीला इन्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठवली. यामुळे तरुणी घाबरून गेली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका तरुणीने रेल्वेप्रवासाती आलेल्या धक्कादायक अनुभवाबद्दल पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये या तरुणीने म्हटले आहे की “मी नुकताच ट्रेनने प्रवास करत होते. यावेळी एका टीसीने कोचमधील प्रवाशांची तिकीट तपासणी केली. यानंतर काही वेळाने मला एका अनोळखी व्यक्तीची Instagram रिक्वेस्ट आली. हा माणूस दुसरा तिसरा कुणी नसून माझ्या कोचमधील तिकीट तपासणी करणारा टीसी होता. आणि त्यानेच मला इन्स्टाग्रामवर शोधले आणि फॉलो रिक्वेस्ट पाठवली, असे तिने सांगितले.
पुढे ती म्हणाली, मला वाटतं की त्याने माझे नाव आरक्षण यादीतून घेतले असावे.”पण या घटनेमुळे मी खूप अस्वस्थ झाली. हे प्रकऱण खूप विचित्र आहे. प्रवासादरम्यान दिलेली वैयक्तिक माहिती फक्त प्रवासापुरती मर्यादित असावी, असं मला वाटत. त्याचा अशा प्रकारे गैरवापर होऊ नये असं तिला वाटतं असल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
तरुणीने केलेल्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी तिला कोणत्याही अनोळखी लोकांची रिक्वेस्ट न स्विकारण्याचा सल्ला दिला आहे. तर काहींनी टीसी सोबत वाद घालू नये, असा अजब सल्ला दिला. अनेक युजर्सनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याविरोधात तक्रार नोंदवण्याचाही सल्ला दिला आहे.
TC checked my ticket and then my Instagram LOL 👀
byu/Active-Parking2365 inindianrailways