लेखक- दिग्दर्शक मंगेश बदर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित

मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये चित्र भारती फिल्म फेस्टिवल सोहळा नुकताच पार पडला. या चित्रपट महोत्सवात ‘नादर’ या चित्रपटातील प्रमुख कलाकार मंगेश बदर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक मंगेश बदर आहेत. नादर या चित्रपटात मंगेश बदर, सरिता बागडे- मंजुळे, राजश्री जगताप हे प्रमुख भूमिकेत आहेत. हा लघू चित्रपट उमरट-सोगाव या गावांमध्ये चित्रित करण्यात आला आहे.

नादर हा लघुचित्रपट असून तो साक्षरता या विषयावर आधारित आहे. ‘ या लघुचित्रपटामधून समाजातील अशिक्षित लोकांच्या जीवनाशैलीवर भाष्य केले आहे. निरक्षरता हा आपल्या दैनंदिन जीवनातील अत्यंत गंभीर विषय बनत चालला आहे. या चित्रपटातून साक्षरतेचे आणि निरक्षरतेचे वास्तव मांडण्यात आले आहे.