
फलटण येथील ऍग्रो न्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनात मुंबईचे ज्येष्ठ कथा लेखक काशीनाथ माटल यांना ‘सावट’ या उत्कृष्ट कथासंग्रह लेखनासाठी ‘धर्मवीर छत्रपती महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार-2026’ देऊन गौरविण्यात आले.
ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे, अशोक मेहता, चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण पार पडले. कथालेखक काशीनाथ माटल यांचे राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

























































