एका रात्रीत तरुण बनला अब्जाधीश, बँक खात्यात अचानक आले 1 अब्ज 13 लाख 55 हजार कोटी रुपये

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील एका बेरोजगार 20 वर्षीय तरुणाच्या बँक खात्यात तब्बल 1 अब्ज 13 लाख 55 हजार कोटी रुपये रक्कम जमा झाली. दीपक असे या तरुणाचे नाव असून त्याने बँकेचा हा मेसेज पाहिल्यानंतर ही माहिती जवळच्या मित्रांना दिली. दीपक आपल्या मोबाईलवर बँकिंग अ‍ॅप चेक करत होता. त्या वेळी त्याला 10,01,35,60,00,00,00,00,00,01,00,23,56,00,00,00,00,299 ही 36 अंकांची रक्कम दिसली.

एवढी मोठी रक्कम पाहिल्यानंतर त्याला धक्काच बसला. कुटुंबाला माहिती दिल्यानंतर तेही घाबरले. या ट्रान्झॅक्शनची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहोचले. पोलिसांनी आयकर विभागाला याची माहिती दिली. आयटी विभागाने तत्काळ दीपकचे बँक खाते गोठवले. या खात्याची तपासणी केल्यानंतर बँकेच्या मुख्य सिस्टममध्ये अशी कोणतीही रक्कम दाखवण्यात आली नाही, परंतु दीपकच्या मोबाईल बँकिंग अ‍ॅपमध्ये ही रक्कम दिसत आहे. यामुळे हा तांत्रिक बिघाड आहे की सायबर फ्रॉड, याची चौकशी केली जात आहे.