मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव यांना पसंती, तरुणांचा ओढा महागठबंधनच्या बाजूने

बिहार विधानसभा निवडणूक 2025 च्या मतदानानंतर आलेल्या प्रारंभीच्या सर्वेक्षण समोर आले आहेत. वोट वाइब सर्वेक्षणानुसार यावेळी सामना अत्यंत चुरशीचा होत आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि राजद नेते तेजस्वी यादव यांच्यातील सत्तेची शर्यत जवळपास बरोबरीत आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षानेही मर्यादित पातळीवर आपला प्रभाव निर्माण केला असून त्यामुळे निवडणुकीची लढत अधिक रंजक बनली आहे.

Vote Vibe Exit Poll 2025 च्या ताज्या आकडेवारीनुसार तेजस्वी यादव हे मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंतीचे उमेदवार ठरले आहेत. सर्वेक्षणानुसार सुमारे 35 टक्के लोकांनी तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे, तर नीतीश कुमार यांना सुमारे 33 टक्के मतदारांचे समर्थन मिळाले आहे. जन सुराजचे प्रमुख प्रशांत किशोर सुमारे 9 टक्के मतदारांच्या पसंतीचे उमेदवार ठरले आहेत. यावरून स्पष्ट होते की बिहारची जनता अजूनही नीतीश आणि तेजस्वी यांच्या गटात विभागलेली आहे आणि अंतिम निकाल कोणत्याही दिशेने जाऊ शकतो.

युवा मतदार यावेळी महागठबंधनाच्या बाजूने थोडेसे झुकलेले दिसत आहेत. तेजस्वी यादव यांनी संपूर्ण प्रचार मोहिमेत रोजगार, सरकारी नोकरी आणि राज्यातून नोकरीसाठी इतर राज्यात झालेल्या स्थलांतर यांसारख्या विषयांवर भर दिला. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात युवकांनी बदलासाठी मतदान केले आहे. पटना, दरभंगा, मुजफ्फरपूर आणि गया यांसारख्या शहरी भागांमध्ये युवकांमध्ये महागठबंधनाची लोकप्रियता स्पष्टपणे दिसून येत आहे.