इंटर्नच्या नोकरीसाठी तरुणाईच्या लागल्या रांगा

एका हिंदुस्थानी तरुणीने कॅनडा येथील नोकऱ्यांचे वास्तव काय आहे ते एका व्हिडीओद्वारे दाखवून दिले. कौंतेया असे या मुलीचे नाव आहे. कौंतेया कॅनडात राहते. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कॅनडातील जॉब फेयरचा व्हिडीओ पोस्ट केला. रोजगार मेळाव्यात अलोट गर्दी झाल्याचे तरुणीने सांगितले. कौंतेया म्हणते, या ठिकाणी फक्त पाच नोकऱ्या आहेत, पण परिस्थिती कशी आहे ते बघा. तरुणीने व्हिडीओमध्ये म्हटलेय की, कॅनडामध्ये भरपूर नोकऱ्या आहेत.

आम्ही खोटे बोलतो आहे असे आमच्या नातेवाईकांना आणि ज्या लोकांना वाटते आहे, त्यांना हा व्हिडीओ मी नक्की दाखवू इच्छिते. बघा या ठिकाणी जॉब फेयर आहे. पाच जागांसाठी ही रांग आहे. जिथवर तुमची नजर जाते आहे, तिथपर्यंत लोक रांगेत उभे आहेत. असेही नाही की, ही काहीतरी मोठ्या पदासाठीची नोकरी आहे. इंटर्न म्हणून काम करायचे आहे तरीही किती गर्दी झाली आहे, तुम्हीच बघा. गुगल, अॅपलसारख्या कंपन्यांसारखीही ही नोकरी नाही. कॅनडाचे हे वास्तव आहे. हे मान्य असेल तरच हिंदुस्थान सोडून कॅनडाला या.