
युट्यूब मॉनेटायझेशन नियमात बदल करणार आहे. त्यामुळे कंटेंट क्रिएटर्सच्या कमाई धोरणावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. युट्यूब पार्टनर प्रोग्राम, हा या प्लॅटफॉर्मवर मॉनेटायझेश पॉलिसी नियंत्रित करतो. नेहमी खरा आणि अधिकृत कंटेंट प्रसिद्ध करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म प्रोत्साहन देतो. आता नवीन नियमानुसार, जे कंटेंट क्रिएटर्स तेच ते व्हिडिओ अथवा कॉपी पेस्ट व्हिडिओ अपलोड करतात, त्यांच्यावर कारवाई करेल. युट्यूबवर मास्ट प्रोडयूस्ड कंटेंट क्रिएटर्सला आता कंटेंट तयार करताना अधिक काळजी घ्यावी लागेल. जर व्हिडिओ नवीन नसेल, पुणाचा तरी ढापला असेल तर त्याची ओळख पटवण्यात येईल. 15 जुलैपासून हे नवीन नियम लागू होतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना काय शिक्षा देणार हे युट्यूबने अद्याप स्पष्ट केलेले नाही.