
ओलाची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक लाँच
ओला कंपनीने हिंदुस्थान बाजारात आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक लाँच केली. ही बाईक गेल्या वर्षीच्या रोडस्टर कॉन्सेप्टवर बेस्ड आहे. या बाईकची किंमत 74,999 रुपये आहे. पंपनीने इलेक्ट्रिक बाइकचे तीन व्हेरियंट्स लाँच केले. यात रोडस्टर प्रो, रोडस्टर आणि रोडस्टर एक्सचा समावेश आहे. रोडस्टर प्रोची किंमत 1,99,999 रुपये आहे, तर या बाईकची रेंज 579 किमी आहे, असा दावा कंपनीने केला आहे. यात एआयसारखे फीचर्स दिले आहेत, असेही कंपनीने म्हटले आहे.
9 सप्टेंबरला जीएसटी काऊन्सिलची बैठक
54 वी जीएसटी काऊन्सिलची बैठक पुढील महिन्यात 9 सप्टेंबरला होणार आहे. पेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत ही बैठक पार पडणार आहे. 53 वी जीएसटीची बैठक 22 जून रोजी दिल्लीत पार पडली होती. लोकसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीत सर्व राज्य आणि पेंद्रशासित प्रदेशचे अर्थमंत्री सहभागी झाले होते. आकडेवारीनुसार, जीएसटी कलेक्शन 10.3 टक्के वाढून 1.82 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
फॉक्सकॉन महिला कर्मचाऱ्यांसाठी हॉस्टेल
आयपह्न बनवणारी कंपनी फॉक्सकॉनमधील महिला कर्मचाऱयांसाठी तामीळनाडू राज्य सरकार हॉस्टेलची निर्मिती करत आहे. खासगी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणारे हे पहिले हॉस्टेल असणार आहे. चेन्नईजवळ वल्लम वडागल येथे उद्या, 17 ऑगस्ट रोजी या हॉस्टेलचे उद्घाटन होणार आहे. या हॉस्टेलमध्ये फॉक्सकॉनच्या 18,720 महिला राहू शकतील. 20 एकारांमध्ये बांधण्यात येणाऱ्या या हॉस्टेलमध्ये 1170 सीसीटीव्ही बसवले जातील.
हॉलीवूड अभिनेत्री जीना रोलँड्स यांचे निधन
हॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जीना रोलँड्स यांचे निधन झाले. त्या 94 वर्षांच्या होत्या. ‘ग्लोरिया’, ‘ओपनिंग नाईट’, ‘अनदर वुमन’ आणि ‘द नोटबुक’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात त्यांनी काम केले. जीना रोलँड्स या गेल्या पाच वर्षांपासून स्मृतिभ्रंश या आजाराने त्रस्त होत्या. अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जीन यांचा मुलगा आणि चित्रपट निर्माते निक कॅसावेट्स यांनी आईच्या निधनाची बातमी दिली. जीन यांनी ‘द हाय कॉस्ट ऑफ लव्हिंग’ या चित्रपटातून कारकीर्दीला सुरुवात केली होती.