
सध्याचा जमाना इन्स्टा रीलचा आहे. त्यातही एखाद्या गाण्यावर सोलो किंवा गटागटाने मिळून डान्स करणे आणि त्याचे रील व्हायरल करणे हा ट्रेंड जोरात आहे. हे वेड शहरी भागांतच आहे असं नाही. गावखेडय़ातील मुली, महिलाही वेगवेगळय़ा गाण्यांवर नृत्य करून आपली हौस भागवताना दिसत आहेत.
हे सगळं हौसेपोटी होत असलं तरी यातले काही लोक असेही आहेत, जे प्रोफेशनल डान्सर्सनाही तोंडात बोटे घालायला लावतील. एका चिमुरडीचे असेच काही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. ही चिमुरडी तिच्या मैत्रिणींना गावातील शेतावरच डान्स करताना दिसते. तिचे नृत्य इतके छान आहे की, व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडतो आहे. chhoti_bristi5631 या अकाऊंटवर यातील काही व्हिडीओ पाहता येतील.