भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने सेंट्रल बँक ऑफ इंडियाला 1.45 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने कर्ज आणि अॅडवॉन्ससह कस्टमर प्रोटेक्शनसंबंधित पेंद्रीय बँकेने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन केले नाही. सेंट्रल बँक यात दोषी आढळल्यानंतर आरबीआयने सेंट्रल बँकेला हा दंड ठोठावला आहे. आरबीआयने ही कारवाई बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट 1949 नुसार केली आहे. सुरुवातीला सेंट्रल बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर बँकेने उत्तर दिले. परंतु यात आरबीआयचे समाधान झाले नाही. त्यानंतर आरबीआयने ही कारवाई केली.