
जेव्हा विमान अपघात झाला तेव्हा आम्ही मृतदेह बाहेर काढले, एका विद्यार्थ्याच्या हातात चमचा होता, जेवतानाच त्याचा मृत्यू झाला अशी माहिती अहमदाबादच्या प्रत्यक्षदर्शी मेडिकलच्या विद्यार्थ्याने दिली. तसेच अपघाताच्या ठिकाणाहून आम्ही कमीत कमी 10 ते 15 मृतदेह बाहेर काढले असेही या विद्यार्थ्याने सांगितले.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक विमान मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळले. त्यात अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. अपघातावेळी वसतीगृहात काय परिस्थिती याबाबत एका प्रत्यक्षदर्शीने माहिती सांगितली. हा विद्यार्थी म्हणाला की, चाळीस सेकंदावरून मी वाचलो. सर्व विद्यार्थी जेवत होते आणि मी माझ्या मित्रांना फोन करून सांगितलं की अपघात झालाय मदत करायला या. अनेक विद्यार्थी जेवताना दबले गेले. एका विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला तेव्हा त्याचा हातात चमचा होता. आम्ही सर्व मित्रांनी मिळून आधी सिलिंड बाहेर काढले. सिलिंडरमुळे मोठा स्फोट झाला असता. त्यानंतर अनेकांचे मृतदेह आणि हळूहळू बाहेर काढले. माझ्या एका मित्राची चप्पल नव्हती त्याची पर्वा न करता तो मदत करत होता.त्याच्या पायात काच घुसली आणि तो रक्तबंबाळ झाला आहे. fire extinguisher सुद्धा चालत नव्हतं, त्यातून फक्त नायट्रोजनची पावडर निघाली. अपघाताच्या ठिकाणाहून आम्ही कमीत कमी 10 ते 15 मृतदेह बाहेर काढले. त्यातले आमचे दोन मित्रच होते असेही या विद्यार्थ्याने सांगितले.
विमान हादसे के चश्मदीद को सुनिए
‘मेस में दोस्त लंच कर रहे थे…विमान गिरा…जोरदार धमाका हुआ…मेरे दोस्त का शव जब निकाला तो उसके हाथ में चम्मच था..’#planecrashahmedabad #planecrash pic.twitter.com/8XiZhJUYYw
— Brajesh Rajput (@drbrajeshrajput) June 13, 2025