पिझ्झा म्हणजे लहानथोरांची आवडती डिश. पिझ्झावर भरपूर चीज टाकून खायला अनेकांना आवडते. गेल्या काही दिवसांपासून अशाच एका पिझ्झाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. त्याला कारणही तसे वैशिष्टय़पूर्ण आहे. या पिझ्झावर 1001 प्रकारचे चीज टाकण्यात आले आहेत.
बेनोइट ब्रुएल आणि फॅबियन मॉन्टेलानिको या दोन फ्रेंच शेफनी हा अनोखा पिझ्झा तयार केला आहे. त्यांच्या प्रयत्नांना चीजमेकर सोफी हॅट रिचर्ड-लुना आणि यूटय़ूबर फ्लोरियन ओनायर यांनी मदत केली. पिझ्झासाठी वापरल्या जाणाऱया चीजपैकी 940 फ्रेंच देशातील तर उर्वरित 61 चीज इतर देशांतील होते. बेनोइट यांनी 2020 मध्ये त्यांनी 254 प्रकारचे चीज वापरून पिझ्झा बनवला होता. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.