
तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रोहित पाटील हे दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यांची मुख्य लढत भाजपमधून अजित पवार गटामध्ये आलेल्या माजी खासदार संजय पाटील यांच्याशी आहे. मात्र रोहित पाटील यांच्या विरोधात रोहित पाटील नावाचे तीन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे नामसाधर्म्य असलेले चार रोहित पाटील तासगाव-कवठे महांकाळमधून निवडणूक रिंगणात आहेत.

























































