पाच दिवसांत 11 भाविकांचा मृत्यू

 

चारधाम यात्रा सुरू होऊन अवघे पाच दिवस झाले आहेत. परंतु या पाच दिवसांत 11 भाविकांचा मृत्यू झाला आहे. चारधाम यात्रेसाठी मोठय़ा प्रमाणात भाविक उत्तराखंडमध्ये पोहोचत आहेत. यात्रा सुरू होताच भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे गर्दीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने दोन दिवसांसाठी चारधाम यात्रेची ऑफलाईन नोंदणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 मे आणि 16 मे असे दोन दिवस ऑफलाईन नोंदणी बंद ठेवली जाणार आहे. चारधाम यात्रेसाठी नोंदणी हरिद्वार आणि ऋषिकेश या ठिकाणी केली जात आहे. ऑफलाईनच्या माध्यमातून ऋषिकेशमध्ये आतापर्यंत 76,120 नोंदणी झाली आहे. हरिद्वारमध्ये 66,251 नोंदणी, यमुनोत्रीमध्ये 59 हजारांहून जास्त भाविकांनी दर्शन घेतले. गंगोत्रीमध्ये 51 हजारांहून अधिक, केदारनाथमध्ये 1 लाख 26 हजार 306 भाविकांनी दर्शन घेतले आहे. बद्रीनाथमध्ये 39 हजार 574 भाविकांनी दर्शन घेतले.

15 एप्रिलपासून आतापर्यंत 26,73519 नोंदणी करण्यात आली आहे. गंगोत्री 4,21,366 नोंदणी झाली असून यमुनोत्रीमध्ये 4,78,576 नोंदणी झाली आहे.