शाळेत शिकवत होते गुड टच, बॅड टच; विद्यार्थिनीने सांगितला अत्याचाराचा प्रसंग

बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर अत्याचार झाला होता. त्यानंतरही राज्यात अनेक ठिकाणहून अशा बातम्या समोर येत आहेत. पुण्यात गुड टच, बॅड टचचे वर्कशॉपदरम्यान सुरु होते. तेव्हा एका मुलीने आपलल्याव लैंगिक अत्याचार झाल्याचे सांगितले. पुण्यात ही घटना घडली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यात एका शाळेत मुलींसाठी गुड टच बॅड टचची कार्यशाळा घेण्यात आली होती. तेव्हा एका मुलीला आपल्यासोबत बॅड टच झाल्याचे लक्षात आले. एका 67 वर्षीय व्यक्तीने या मुलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. शिक्षिकेने ही बाब मुख्याध्यापकाला सांगितली. मुख्याध्यापकांनी ही बाब पीडित मुलीच्या आई वडिलांना कळवली. आई वडिलांनी पोलीस स्थानकात तक्रार केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.