
अवघ्या 11 वर्षांची मुलगी वर्षाला 85 कोटी रुपये कमावत असल्याची माहिती समोर आली आहे. डियाना किडिसीयुक असे या छोटय़ा मुलीचे नाव आहे. ती एक यूटय़ूबर असून किड्स डायना शोची स्टार आहे. तिचे या चॅनेलवर 135 मिलियनहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. डायनाने आपल्या यूटय़ूबची सुरुवात केवळ एक वर्षाची असताना केली होती. सुरुवातीला ती व्हिडीओ केवळ मित्रांसाठी आणि नातेवाईकांसाठी बनावयची, परंतु ज्या वेळी व्हिडीओ व्हायरल झाले, त्या वेळी तिच्या आई-वडिलांनी तिला फुलटाईम व्हिडीओ बनवण्यास सांगितले. तिच्या आई-वडिलाला टेक्नोलॉजी आणि मार्पेटिंगचा अनुभव असल्याने डायनाला मोठा फायदा झाला. तिची आई तिला कंटेट आयडिया देते, तर वडील तिचे आर्थिक व्यवहार पाहतात. बाकीची टीम व्हिडीओ शूट आणि एडिट करते. छोटय़ा मुलांसाठी मनोरंजन करणे हे आपले ध्येय आहे. तसेच व्हिडीओतून मिळालेल्या पैशांतून आई-वडिलांना आर्थिक मदत होते, असे डायना म्हणते. तिचे व्हिडीओ एकदम घरातील वाटतात. तिला या व्हिडीओतून वार्षिक 10 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 85 कोटी रुपये मिळतात.