तिवरे दुर्घटनेतील आई-वडीलांचे छत्र हरपलेल्या रूद्रला १२ लाख रूपयांची मदत

394

चिपळुण तिवरे येथील दुर्घटनेतील  आई-वडीलांचे छत्र हरपलेल्या रूद्र रणजीत चव्हाण याला राज्य शासन तसेच पंतप्रधान कार्यालय सहाय्यता निधीतून मदत करण्यात आली.  रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते रूपये १२ लाखाचा धनादेश देण्यात आला.

तिवरे येथील दुर्घटनेत रूद्रचे वडील रणजीत चव्हाण, आई रूतूजा चव्हाण तसेच दीड वर्षांची बहिण दुर्वा हिचा मृत्यु झाला. बहिण दुर्वाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. तिवरे येथे आले असतांना रूद्रची कहाणी पालकमंत्र्यांना कळली. त्याचवेळी त्यांनी रूद्रच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी उचलत असल्याचे घोषित केले होते.

रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीतील ग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी चिपळुण येथे आले असताना शासकीय विश्रामगृहावर रूद्रला राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनातून आई व वडीलांच्या नावे प्रत्येकी रूपये ४ लाख तसेच पंतप्रधान सहायता निधीतून  आई व वडीलांच्या नावे प्रत्येकी रूपये २ लाखांचा असा एकूण रूपये १२ लाखांच्या निधीचा धनादेश  पालकमंत्री वायकर यांच्या हस्ते रूद्र चव्हाण याला देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम, प्रांत जगताप, तहसिलदार जीवन देसाई मुख्याधिकारी विधाते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या