
बिहारमध्ये 13 कोटी खर्चून बांधलेला रोपवे केबिनसह चाचणीदरम्यान कोसळला. त्याचे काम मागील सहा वर्षे सुरू होते. रोहतासममध्ये रोपवेची चाचणी सुरू असताना रोपवे कोसळल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. 2019 मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत रोपवेच्या कामाचा शुभारंभ झाला होता.
























































