मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहात 150 बेडचे कोविड सेंटर

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात पालिकेला यश आले असले तरी ऑगस्टमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे पालिकेने तयारी सुरू केली आहे. यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील विद्यार्थी वसतिगृहात 150 बेडचे अद्ययावत कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आले. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज या कोविड सेंटरचे लोकार्पण करण्यात आले.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिका विविध उपाययोजना करत आहे. यामध्ये नवीन चार जम्बो कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून मालाडमध्ये नवे जम्बो कोविड सेंटर सुरूही करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक वॉर्डमध्ये आवश्यक बेडची व्यवस्थाही करण्यात येत आहे. यानुसार विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये 150 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. पालिकेने आशिया फाऊंडेशनच्या सहकार्याने हे कोविड सेंटर सुरू केले आहे. यावेळी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, नगरसेवक प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, सहायक आयुक्त अलका ससाणे, स्वयंसेवी संस्थेचे विशाल गुरणानी, प्रणव रामटेके आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या