
चीनमधील जिगोंग शहरात एका 14 मजली शॉपिंग मॉलला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. आगीचे माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत 75 जणांना सुरक्षित बाहेर काढले.
‘इंडिया टीव्ही’ने दिलेल्या माहितीनुसार, सदर 14 मजली मॉलमध्ये डिपार्टमेंटल स्टोर, ऑफिस, रेस्टरन्ट, थिएटर आहे. मॉलच्या खालच्या मजल्यांवरून अचानक धूर येऊ लागला. त्यानंतर बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केले. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. आग इतकी भयानक होती की अग्नीशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य होते. अखेर ड्रोनच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले.