
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
जलयुक्त शिवार अभियान योजनेअंतर्गत 2018-19 मध्ये 16 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांच्या 234 कामांचा 6 कोटी 38 लाख 71 हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. तर सन 2015-16 ते 2018-19 या चार वर्षात या योजनेअंतर्गत जिल्ह्याला एकूण 58 कोटी 8 लाख 20 हजार रूपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत.
पिण्याच्या पाण्याची सहज उपलब्धता व्हावी आणि महाराष्ट्र टंचाईमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियान हि महात्वाकांशी योजना सन 2015-16 पासून सुरु केली आहे. ही योजना गेली तिन वर्षे यशस्वीरित्या राबवित आहे. योजनेअंतर्गत 2018-19 या वर्षांकरिता जिल्ह्यातील 16 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांची शिवार फेरी काढून 234 कामांचा आराखडा तयार करण्यात आला. यासाठी 6 कोटी 38 लाख 71 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
या 16 गावांमध्ये वैभववाडी तालुक्यातील जांभवडे, तिरवडे तर्फ सौंदळ, उपळे, मौदे, वेंगरस, ऐणारी, भुईबावडा, रिंगेवाडी, कणकवली तालुक्यातील फोंडा, बोर्डवे, मालवण तालुक्यातील त्रिम्बक, कुडाळ तालुक्यातील तेंडोली, झाराप, नेरूर कर्याद नारूर, वेंगुर्ला तालुक्यातील श्रीरामवाडी तर दोडामार्ग तालुक्यातील परमे या गावांचा समावेश आहे.
2018-19 साठी निवड करण्यात आलेल्या 16 गावांमध्ये कृषी विभागामार्फत 135 कामे केली जाणार असून त्यासाठी 1 कोटी 74 लाख 46 हजार रूपये एवढा निधी, वन विभागामार्फत 16 कामांसाठी 40 लाख 89 हजार रूपये, सामाजिक वनीकरण विभागामार्फत 13 कामांसाठी 2 लाख 60 हजार रूपये, लघु पाटबंधारे विभागामार्फत 17 कामांसाठी 1 कोटी 61 लाख 50 हजार रूपये तर ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत 53 कामांसाठी 2 कोटी 59 लाख 29 हजार रूपये एवढा निधी खर्च केला जाणार आहे.
2017-18 च्या कामांना 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ
शासनाच्या जलयुक्त शिवाय योजनेंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी विषयक कामे केली जात आहेत. सन 2017-18 या वर्षात 37 गावांमध्ये सुरु असलेल्या कामांची मुदत जून मध्ये संपली होती. मात्र ही कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
58 कोटी 8 लाख 20 हजार रुपयांची कामे
महाराष्ट्र शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्वाकांशी योजना सन 2015-16 पासून सुरु केली आहे. सन 2015-16 ते 2018-19 या चार वर्षात जिल्ह्यातील 111 गावांची निवड करण्यात आला असून यात सन 2015-16 साठी 22 कोटी 83 लाख 45 हजार रूपये, सन 2016-17 साठी 14 कोटी 44 लाख 4 हजार रूपये, सन 2017- 18 साठी 14 कोटी 42 लाख रूपये तर सन 2018-19 साठी 6 कोटी 38 लाख 71 हजार रूपये असा एकूण 58 कोटी 8 लाख 20 हजार रूपये एवढ्या मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलयुक्त शिवाय योजनेच्या माध्यमातून कामे हाती घेण्यात आली आहेत.
सर्वाधिक परमे गावाचा मोठा आराखडा
मंजुरी देण्यात आलेल्या एकूण आराखड्यात सर्वाधिक परमे गावाचा 32 कामे आणि एक कोटी 15 लाख 20 हजार रुपये खर्चाचा आराखडा आहे. जांभवडे दहा कामे आणि 5 लाख 97 हजार, तिरवडे तर्फे सौदळ 7 कामे 4 लाख 11 हजार रुपये, ऊपळे 9 कामे 21 लाख 40 हजार रुपये, वेंगसर 9 कामे तीन लाख 6 हजार रुपये,, ऐनारी 8 कामे 13 लाख 33 हजार रुपये, भुईबावडा 8 कामे 27 लाख 32 हजार रुपये, रींगेवाडी 16 कामे 23 लाख 55 हजार रुपये, फोंडा 24 कामे 53 लाख 52 हजार रुपये, बोर्डवे 33 कामे एक कोटी 5लाख 64 हजार रुपये, त्रिबक 5 कामे 7 लाख 33 हजार रुपये, तेंडोली 28 कामे 83 लाख 16 हजार रुपये, झाराप 12 कामे 59 लाख 9 हजार रुपये, नेरूर कर्याद नारूर 21 कामे 57 लाख 60 हजार रुपये, श्रीरामवाडी 8 कामे 54 लाख 64 हजार रुपये या प्रमाणे गावनिहाय कामे व रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
































































