राममंदिराच्या दरवाजांवर 18 किलो सोन्याचा मुलामा

अयोध्येतील राममंदिराच्या एकूण 6 दरवाजांवर 18 किलो सोन्याचा मुलामा चढवला जात आहे. प्रत्येक दरवाजावर 3 किलो सोन्याचा मुलामा दिला जाणार आहे. मुख्य कलश आणि राम दरबाराच्या सिंहासनावरही 3 ते 4 किलोच्या सोन्याचा मुलामा दिला जाणार आहे. राममंदिराच्या तळमजल्यावर 14 दरवाजांवर सोने बसवण्यात आले होते. त्या वेळी प्रत्येक दरवाजावर 3 किलो सोने वापरले गेले होते. श्री राम दरबाराचा अभिषेक जूनमध्ये होणार आहे. त्यामुळे आतापासून याची तयारी केली जात आहे. राम दरबाराच्या मूर्ती पहिल्या मजल्यावर आल्या आहेत. राम आणि सीता सिंहासनावर बसतील असे सांगितले जात आहे. राममंदिराच्या पहिल्या मजल्यावर एकूण 6 दरवाजे बसवले जात आहेत.