
कुडाळमधील विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग जिह्यातील दहा निवडक पाणथळ जागांवर प्लॅस्टिकमुक्त स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. रविवारी घेण्यात आलेल्या या पाणथळ स्वच्छता मोहीमेमध्ये कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाने पाणथळ मोहिमेबाबत समाजामध्ये जनजागृती करत स्वच्छतेचा संदेश दिला.
या स्वच्छता मोहिमेचा पहिला टप्पा पाट तलाव येथे पार पडला. या पाट तलावातून विद्यार्थ्यांनी जवळपास 200 किलो प्लॅस्टिक व इतर कचऱयाचे संकलन केले. स्वच्छता मोहिमेमध्ये संत राऊळ महाराज महाविद्यालय (कुडाळ)मधील विद्यार्थी, प्राध्यापक, वन विभाग सावंतवाडी, देशपांडे फाऊंडेशन, वनशक्ती फाऊंडेशन, पाट ग्रामपंचायत, तरुण भारत मुंबई आणि स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.